पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठरे यांच्यावर टीका करताना अनेकदा दिसून आले आहेत अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
तसेच या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत. मात्र यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
पाटील म्हणाले की,कोणत्या निकषावर मुख्यमंत्री पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.