नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर- चंद्रशेखर बावनकुळे

 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर येऊन सामना नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज पुराचे पाणी नागरिकांच्या घरातशिरल्यामुळे अनेकांचा संसार पुरच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यातच रायगडमधील तळीये गावावर दरड कोसळल्याने ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यु झाला. महापूराच्या पाण्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झालीत. तर अनेक व्यापारांच्या मालाचं नुकसान झालं आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते चंंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात आलेली नैसर्गिक संपत्ती हाताळण्यात महाविकास सरकारची रिक्षाची सर्व चाकं पंक्चर झाली आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे संकट जरी अस्मानी असलं तरी सुलतानी हाताळणीमुळे त्याचं गांभीर्य वाढल्याचं चंंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. औरंगाबादमध्ये ते बोलत होते.

महाविकास आघााडी सरकारच्या तिन्ही चाकांचे तुकडे उडायला सुरुवात झाली आहे. हा सांगाडा कुणी भंगारातही विकत घेणार नाही. मुख्यमंत्री हे मुंबईतून तर उपमुख्यमंत्री हे पुणे आणि बारामतीतून बाहेर पडत नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आता या टीकेला आघाडीचे मंत्री काय तंत्रे देणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: