मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं – बाळासाहेब थोरात

राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. या घोषणेनंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दुजोरा दिला होता. मात्र काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी मोफत लस देण्याच्या निर्णयाचे ट्विट डिलीट केले होते. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त करून दाखवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे असे वक्तव्य जाहीरपणे बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांना विहंकारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे,

मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असं थोरात म्हणाले.

Team Global News Marathi: