मुख्यमंत्री मला विचारून तो निर्णय घेणार नाहीत – अजित पवार

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीचा भांडाफोड केला होता. या आरोपानंतर काल मध्यरात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मुद्द्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चौकशी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

अजित पवार म्हणाले, ‘हे आरोप गंभीर आहेत यात शंका नाही. त्याबद्दल अनिल देशमुखांना जे काही सांगायचे होतं ते त्यांनी सांगितलं आहे. माझ्यासह बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे अशा सर्वच सहकाऱ्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे. आता त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय काय घेतात हे कळेलच. ते मला विचारून निर्णय घेणार नाहीत. मात्र, त्यांचा जो काही निर्णय असेल, त्यामागे आम्ही सगळे राहू. असे अजित पवार यांनी बोलून दाखविले होते.

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले एक पत्र कालच ट्वीट केले होते. परमबीर यांनी आपल्यावर केलेल्या आरोप खोटे आहेत. सरकारने याची चौकशी करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावं, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: