मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कामगिरी करू शकलो – डॉ तात्याराव लहाने

राज्यात मार्च महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झालेला महाराष्ट्र पाहायला मिळत होता. मात्र अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकरने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आता सर्व स्तरातून राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक होताना दिसत आहे. त्यात आता डॉ तात्याराव लहाने यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला आहे की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे, असं तात्याराव लहाने म्हणाले आहेत. ते लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना लहाने म्हणाले की, रोज २ लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३८ टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे, असं म्हणत तात्याराव लहाने यांनी राज्य सरकार आणि उद्धव ठाकरेंचे तोंड भरून कौतुक केले आहे.

Team Global News Marathi: