मुंबई : सतत वादग्रस्त वक्तव्य करत आपल्या अडचणी वाढवण्याचे काम करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या सुरक्षा रक्षकाने आता तिच्या अडचणी वाढवल्या आहेत. समोर आलेल्या माहिती नुसार कंगणाचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुमार हेगडेवर लग्नाचं आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि ५० हजार रुपये घेतल्याचा केल्याचा आरोप आहे. या संदर्भात सदर महिलेने कुमार हेगडे विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाचे नाव चर्चेत आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सदर महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे तिला २०१३ मध्ये भेटला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये हेडगेने तिला प्रपोज केलं. तिने होकार दिल्यानंतर हेगडे अधूनमधून तिच्या फ्लॅटवर यायचा आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवायचा. अनेकवेळा त्याने जबरदस्ती केली. २७ एप्रिल रोजी हेगडे आपल्या घरातून ५० हजार रुपये घेऊन पळाल्याचा आरोप महिलेनं केला आहे.