मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासनाकडून सुरु असून, शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा वाढता पाठींबा पहावयास मिळत आहे

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा व शहरात केलेल्या एकदिवसीय सदस्य नोंदणीत ११ हजार शिवसैनिकांनी सत्यप्रतिज्ञापत्र संकलित करून मा.मुख्यमंत्री महोदयांना जाहीर पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करून शिवसेनेची ताकद वाढवू, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून संकलित केलेली ११,००० सत्यप्रतिज्ञापत्रे आज मा.मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविण्यात आली. ९ ऑगस्ट या क्रांती दिनी शिवसेनेच्यावतीने भव्य दुचाकी क्रांती रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या रॅलीत १० जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. यासह शहराततून ही रॅली मार्गक्रमण करणार असून, यातून शिवसेनेची खरी ताकद दाखवून देण्यासाठी जिल्ह्यासह शहरातील शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन केले.

Team Global News Marathi: