मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट !

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत मोठा राजकीय भूकंप केला. त्यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले.राज्यात शिंदे-फडणवीस असं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करत आहेत. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे.

सर्व प्रथम खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतल्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते लीलाधर डाके , यांची भेट घेतली. यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकाच दिवशी घेतली शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी सध्या भेटीगाठीचा सपाटा लावला आहे. अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी शिंदे घेत आहेत. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. तर बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत. तर मनोहर जोशी हे दखील शिवसेनेतील एक मोठ नाव आहे.

Team Global News Marathi: