मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्यात म्हणजे कळेल कोणाचे आयुष्य उध्वस्थ झालं – देवेंद्र फडणवीस

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता ठाकरे सरकार आणि विऱोहदकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का?असा प्रश्न निर्माण होतोय, असं म्हटलं. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचे स्पष्ट दिसतं आहे. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुले मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: