ज्याला गाव सोडून दुसऱ्या गावाला जावं लागत, त्याच्या बद्दल मी काय बोलणार – शरद पवार

बीड जिल्यातील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांचे नाव पुढे आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच आघाडी सरकारवर बेछुड आरोप करत आहे. त्यातच मुंडे प्रकरणाचा हवाला देत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.

आता पाटलांच्या या टीकेला शरद पवारांनी टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेतेही आक्रमक झालेले दिसत आहे. याच प्रकरणावरून ‘पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

पाटलांच्या विधानाचा हवाला देत शरद पवार यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Team Global News Marathi: