लवंगी त्यांनी फोडला दिवाळीनंतर मी बाँम्ब फोडणार ” मलिक यांच्या टिकेनंतर फडणवीसांचे प्रतिउत्तर

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्स उद्योगाचे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच यामध्ये त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही संबंध असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, मलिक यांच्या सर्व आरोपांना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: