लवंगी फटका होता तर इतके दिवस दाबून का ठेवला होता , राऊतांच्या टीकेवर फडणवीसांचा पलटवार

मुंबई : फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. तसेच त्यांच्या आरोपांमध्ये काही सत्यता नसल्याचे सुद्धा राऊतांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले होते.

आता संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते आज भाजपच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राजभवनाच्या बाहेर पत्रकार मद्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता.

फडणवीस म्हणाले की, काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. कोणाला वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी बोललं पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोललं तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकार व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असा टोला ही फडणीवसांनी लगावला होता.

Team Global News Marathi: