ब्रेकिंग न्यूज: बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन –

ब्रेकिंग न्यूज: बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन –

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या काळात सार्वजनिक उद्यानांसह खासगी आणि शासकीय बस सेवा सुद्धा खंडित केल्या जात आहेत.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अखेर बीड जिल्हात लॉकलाडून ची घोषणा केली.

केंद्र सरकारकडून २० मार्च २०२० पासून लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्प्या-टप्प्याने ३१ मार्च २०२१ पर्यंत त्यामध्ये वाढ होत गेली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाउन लागू केला जात आहे. हा लॉकडाउन नगपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण भागांत सुद्धा लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे  10 दिवसाचे लॉकडाऊन केले आहे 25 मार्च च्या मध्ये रात्री पासून 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असणार आहे या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ए राजा ,जिल्हा परिषदेचे अजित कुंभार हे उपस्थित होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: