आता नागरिकांनी स्वतः मीटर रीडिंग घेऊन वीज वितरण कंपनीला पाठवावे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आव्हान

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मागच्या लॉकडाऊन प्रमाणे येणाऱ्या अव्वाच्या-सव्वा बीलापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी स्वतः वीज मीटर रीडींगचे फोटो काढून वीज वितरण कंपनीला पाठवावे असे आव्हान मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

तसेच वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी मंत्री नितीन राऊत यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

करोना काळात रीडिंग न घेता बिलं पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिलं पाठवावीत. करोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Team Global News Marathi: