या देशातील नागरिकांची मास्कपासून सुटका तसच लसीकरणाचीही आवश्यकता नाही

 

संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढलं असून जागतिक आरोग्य संगटनेच्या तसेच विविध देशांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेक देश पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहेत अशातच युरोपियन देशात कोरोना संदर्भात वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क तसंच लसीकरण महत्त्वाचं आहे. मात्र या देशात मास्क आणि लसीकरणातूनच नागरिकांची सुटका केली आहे. युरोपमधील देशांमध्ये मास्क आणि लसींची आवश्यकता हटवण्यात येत आहे.स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. यासोबतच लोकांना सोबत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामारी संपण्याच्या मार्गावर? केवळ मास्कच नाही, तर तिथली सरकार कोरोना लसीची आवश्यकता देखील हटवण्याची शक्यता आहे. सरकारचा विश्वास आहे की, कोरोनाचे केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल आणि ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यूके आता साथीच्या रोगापासून स्थानिक पातळीवर जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे असे युकेचे सचिव म्हणाले आहेत.

यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेज यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध संपवून सामान्य जीवनात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडमध्ये लसीकरणाची आवश्यकता नाही ते म्हणाले की, आता ते महामारीच्या समाप्तीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात गुंतले आहेत. मात्र युरोपची सरकारे कदाचित वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर त्याचे तुलना करत आहेत.

Team Global News Marathi: