मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत असते. विचित्र कपडे घालून कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.‘उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?;’ अशी टीका करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या अटकेची मागणी केली आहे.
मात्र चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर उर्फीने देखील त्यांनी सडेतोड इत्तर दिलं. आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातिला वाद शमण्याचं नाव घेत नाही.चित्रा वाघ यांच्यानंतर उर्फी जावेद हिच्याविरोधात महिला संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विचित्र कपड्यांवर एकीकडे वाद सुरु आहे, तर दुसरीकडे उर्फीच्या चाहत्यांची संख्या मात्र मोठ्या संख्येने वाढली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार उर्फीच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. उर्फीच्या सोशल मीडिया फॉलोअर्सबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या वर्षी मे महिन्यात इन्स्टाग्रामवर उर्फीच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास ३ मिलियन होती. आता चित्रा वाघ यांच्या आक्षेपानंतर उर्फी जावेद हिच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आता इन्स्टाग्रामवर उर्फीचे ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. गेल्या वर्षी ट्विटरवर उर्फीला फॉलो करणाऱ्यांची संख्या 123.6K इतकी होती आता ही संख्या 123.7K पर्यंत पोहोचली आहे.