चित्रा वाघ यांना डच्चू ? भारतीय जनता पक्षाकडून ‘या’ नावांची चर्चा !

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश असून मुंबई महापालिकेतील पुरेशा संख्याबळामुळे शिवसेना आणि भाजपसाठी सोपा पेपर असणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून उत्तर भारतीय किंवा बिहारी चेहरा उमेदवार म्हणून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सध्याचं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवर सहज विजयी होऊ शकते. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य रामदास कदम हे शिवसेनेतून तर काँग्रेस पक्षाकडून भाई जगताप यांच्या दोन जागांवर कार्यकाळ संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांवर शिवसेना मराठी चेहरा उमेदवार देईल अशी शक्यता आहे.

त्याच वेळी भाजपाकडून भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत असतानाच मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजप मुंबईतून उत्तर भारतीय अथवा बिहारी चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता अधिक असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: