मुलाच्या लग्नाच्या दिवशीही कृषीमंत्री दादा भुसे यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला नव्हता. सोमवारी दादा भुसे यांनी आपल्या मुलाचा विवाह आटपून थेट मालेगावमधील सहारा कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णाची विचारपूस केली होती. त्यामुळे मुलाच्या लग्नाच्या अक्षता पडताच ऑनफील्ड मंत्री दादा भुसे कामाला लागले होते, आता त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे,
कृषीमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार आणि ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार पार पडला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. ‘मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.
या लग्नाला खुद्द नवं वधू-वरांना वरांना आशीर्वाद देण्यासाठी नगरविकास मंत्री दादा भुसे मालेगावात दाखल झाले होते. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली. ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.