१४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पळाला जाईल – नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली | १४ ऑगस्ट याच दिवशी १९४७ साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह स्थलांतर व्हावं लागलं. फाळणीच्या या जुन्या आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावुक झाले आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट करत १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे की, ‘देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावं लागलं. अनेकांनी जीव गमावला.

त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: