चिक्की घोटाळा | भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ

 

मुंबई | भाजपा सरकारच्या काळात झालेल्या चिक्की घोटाळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. याच मुद्द्यावर विरोधकांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा सुद्धा मागितला होता. त्यातच आता चिक्की घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. चिक्की घोटाळ्यात गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

अंगणवाड्यांमधील लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून चिक्कीचा पुरवठा तसंच अन्य वस्तूंचं वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. मात्र या आरोपांविषयी अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

इतरवेळी मिठायांमध्ये दर्जाहीनता आढळली तरी गुन्हा दाखल केला जातो. मग या प्रकरणात लहान मुलांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा पुरवठा झाल्याचा आरोप असताना अद्याप गुन्हा दाखल का नाही,’ अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशोरे ओढले आहेत.

राज्यात अंगणवाड्यांमधील लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून चिक्कीचा पुरवठा तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांविषयी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सवाल केला आहे.

Team Global News Marathi: