मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले मुंबईदेवीचे दर्शन, घातले हे साकडे

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे आज पासून संसर्गाचे नियम पळून उघडण्याची परवागी देण्यात आली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर खुली झाली. राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यातच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनिमित्त आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबादेवीला कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना देवीच्या चरणी अर्पण केली असून, आजपासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे की, आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

Team Global News Marathi: