संभाजीनगर महानगर पालिका करणार १०,००० हजार कोरोना चाचण्या

संभाजीनगर : संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी संभाजीनगर महानगर पालिकेने आपली कंबर कसली आहे. त्यात महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. यासाठी रोज दहा हजार चाचण्या करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे.

संभाजीनगर शहरात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. यामुळे शहरात कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसर्ग अधिक गतीने परसत असल्याने त्यास नियंत्रित करण्यासाठी आता कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

तसेच लसीकरणाची मेगा मोहीम प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. त्यासोबतच चाचण्यांचीही मोहीम राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या रोज सरासरी चार ते पाच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तीच संख्या दहा हजारापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट प्रशासकांनी दिले आहे. त्यादृष्टीने नियोजन देखील केले जात आहे, असे डॉ. राठोडकर यांनी सांगितले.

Team Global News Marathi: