छत्रपती उदयनराजे सिल्व्हर ओक वर ; शरद पवारांची घेतली भेट

सातारा : भाजपचे खासदार असूनही उदयनराजे भोसले यांनी केवळ नेत्यावरील प्रेमापोटी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तबेतीची चौकशी केली. यावेळी उदयनराजेंनी त्यांना तब्येतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मध्यंतरी पित्ताचा त्रास झाला होता. त्यानंतर तपासणी केल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रकियेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच शरद पवार नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसल्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. आज साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘सिल्वर ओक’ या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली. त्यांनी श्री. पवार यांच्याशी तासभर चर्चा देखील केली.

यावेळी उदयनराजेंनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही श्री. पवार यांना दिला. उदयनराजेंनी श्री. पवार यांच्या घेतलेल्या भेटीची राजकिय वर्तूळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी लॉकडाऊन तसेच वाढलेला कोरोनाचा संसर्ग या विषयांवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाली.

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशीचे संकट ओढावल्यानंतर सध्या राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सिल्व्हर ओकवर(Silver Oak) बैठकी सुरू आहेत. अशातच उदयनराजे भोसले(Udayan Raje Bhosale) सिल्व्हल ओकवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: