दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग करणारा राष्ट्रवादीचा नेता आला शरण

 

अल्पवयीन मुलीचा विनयभंगाचा गुन्हात अडकलेला राष्ट्रवादी नेता अखेर भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव पोलिसांना शरण आला.तब्बल २३ दिवसानंतर आंधळगाव पोलिसांना आत्मसमर्पित केले आहे. सुमेध श्यामकुवर असे त्या आरोपीचे नाव असून शरणागतीनंतर आंधळगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर राष्ट्रावादी नेता व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे विरोधकांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे.

25 फेब्रुवारी रोजी सुमेधने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली चारचाकी गाडी थांबली आणि पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. दुसऱ्यादिवशी २६ फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला पीडितेच्या तक्रारीवरून सुमेध श्यामकुवर यांच्यावर पास्को ८ व ३५४ अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी तपास करत मुलीच्या फिर्यादीवरुन ठाणेदार सुरेश मटामी यांनी कलम 354 व पास्को 8 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत होते. अखेर सुमेध श्यामकुवर पोलिसांना शरण आला.

Team Global News Marathi: