चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

 

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश यांनी दोन लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, सदरील व्यक्ती पैसे परत मागत असल्याचे या ऑडीओ क्लिपमधील संभाषणत जाणवत आहे. तर पैसे देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ऋषी खैरे टाळाटाळ करत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये समोर येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिप मधून समोर येत आहे. विशेष म्हणजे तसं ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.
या सर्व प्रकरणावर माध्यमांनी ऋषिकेश खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, कोरोनाच्या आधी माझा एका मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्याने करून देऊ, असे मी त्याला सांगितले होते.

मात्र अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्यांचे काय पैसे माझ्याकडे असतील ते देण्यासाठी मी तयार असल्याचं ऋषिकेश खैरे म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. यावरून आता विरोधात कशा प्रकारे ठाकरे गटाला घेरतायत हे पाहावे लागणार आहे.

 

Team Global News Marathi: