“पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”

 

मुंबई | लॉकडाऊ आणि कोरोनाच्या भीतीने अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. लॉकडाऊन उघडल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच बेरोजगारीसारखे संकट समोर येऊ लागले.याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी पंतप्रधान कार्यालय तसेच सीएमओला टॅग करत सूचक ट्विट केले आहे. सध्या या ट्विटची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होताना दिसून येत आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात,”अमेरिका-चीन व्यापारयुद्ध आणि कोरोना नंतरच्या काळात बदललेल्या जागतिक रचनेचा परिणाम म्हणून चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या. Google, Adidas, Samsung व्हिएतनामला, Hyundai, Honda अमेरिकेत, JVC Kenwood, Iris Ohyama जपानला, Murata थायलंडला, Harley Davidson मलेशियाला गेली” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

रोहित पवार पुढे म्हणतात,”या कंपन्यांना भारत सर्वात जवळचा पर्याय असूनही त्या भारतात आल्या नाहीत. कारण त्यासाठी पूरक वातावरणही असावं लागतं, पण यातच आपण कमी पडतोय” असं स्पष्ट मत रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच सर्व राज्यांना विनंती आहे की, आजच्या बेरोजगारीच्या काळात अशा कंपन्या देशात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असं म्हणत पवार यांनी थेट पीएमओ सह महाराष्ट्र सीएमओला देखील टॅग केले आहे.

 

Team Global News Marathi: