चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नाहीत

 

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काल रास्तवराडीचे आमदार रोहित पवारांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्यावर टीका केली होती यावरून रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळाली होती आता रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नयेत असे दरेकर म्हणाले. चंद्रकांतदादांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत असेही दरेकर म्हणाले.

चंद्रकांत दादा मूळ विषय होता महागाईवरील निवेदन स्वीकारण्याचा. पण नेहमीप्रमाणे तो भरकटवण्यासाठी तुमच्या पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलण्याचं किळसवाणं कृत्य केलं. त्याविरोधात मग चिडलेल्या महिलांनी महिषासुरमर्दिनीचं रूप घेतल्यावर आता आपण अंडं.. अंडं म्हणून कांगावा करतो. महागाई हा मूळ विषय अजून किती दिवस असा भरकटवण्याचा प्रयत्न करणार आहात? संस्कृतीबाबत बोलायचं तर फडणवीस साहेबांवर चप्पलफेकीचा प्रयत्न झाला तेंव्हा त्याचा आम्ही निषेधच केला.

‘चुकीच्या गोष्टीचा निषेध आणि चांगल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे,’ ही आम्हाला साहेबांची नेहमीच शिकवण असते. असे रोहित पवार म्हणाले होते. आपण मोठे नेते आहात आणि अनेक कार्यकर्ते आपला आदर्श घेत असतात. महिलांवर हात उचलण्याचं आपण समर्थन करत असाल तर समाजात चुकीचा मेसेज जाऊ शकतो असे रोहित पवार म्हणाले होते.

Team Global News Marathi: