चंद्रकांतदादा… दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील जनता शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली होती. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. त्या संदर्भात त्यांनी ट्विट करून पाटलांना टोला लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. चाकणकर यांनी ट्विटरवर व्हीडिओ शेअर करुन चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे.

चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: