पराभवाची सवय लावून घ्या हे वारंवार होणार, भुजबळांनी लगावला चंद्रकांत पाटलांना टोला !

पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु झालेली आहे. त्यात मंत्री भुजबळ यांच्या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ जास्त बोलू नका तुम्ही जामिनावर बाहेर सुटला आहात असा टोला लगावला होता. आता चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी पुन्हा जोरदार उत्तर दिले आहे.

भजबल म्हणाले की, मला महागात पडेल असा इशारा देता, सीबीआय-ईडीसारखी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. ‘मैं मेरा बंगाल नही दुंगी असं ममतांनी सांगितलं, या माझ्या बोलण्यावर रागावण्यासारखं काय आहे. तसंच ‘पराभवाची देखिल सवय करून घ्यायला पाहिजे, कारण आता वारंवार हे फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार’ असा टोलाही भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

समीर भुजबळला माझ्याआधी अटक झाली होती, मत तो माझ्या जामिनासाठी यांच्याकडे कसा जाईल, असं म्हणत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांचे समीर भुजबळ सुटकेसाठी येत असल्याचे विधान खोडून काढले आहे. सीबीआय, ईडी यांचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होतं, पण आता न्यायदेवतापण त्यांच्या हातात आहे का?’ असा मला प्रश्न पडल्याचे भुजबळ म्हणाले. आता भुजबळांच्या या टीकेला पाटील या ऊत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: