चंद्रकांत पाटलांच्या पत्राने गडकरींची अडचण? वाचा काय आहे प्रकरण |

 

मुंबई | जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारणाच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कमी किंमतीत विक्रीस काढलेल्या राज्यातील 30 सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ज्या कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्या दोन कारखान्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपल्याच केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे का याची चर्चा आता महाराष्ट्रात रंगताना दिसत आहे.

वैनगंगा आणि महात्मा या दोन साखर कारखान्यांवर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांचे चिरंजीव संचालक म्हणून काम पाहतात. या दोन कारखान्यांची खरेदी ही पूर्ती कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती. हा व्यवहार २००९-१० साली झाला असून नितीन गडकरींचे चिरंजीव पूर्ती समूहाशी संबंधित होते. आता पूर्ती ही कंपनी ‘मानस’ या कंपनीमध्ये मर्ज्य झाली असून त्यावरही नितीन गडकरींचे चिरंजीव संचालक आहेत.

Team Global News Marathi: