चंद्रकांत पाटलांच्या मानहानीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया;

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेकमंत्र्यांवर आरोप लावण्यात येत आहे. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून मुश्रीफ यांची बाजुबा घेतली होत. त्यातच याच मुद्धयांवरून चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्याविषयी केलेल्या आरोपावरून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही अशी मिश्किल टिप्पणी केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या टिप्पणी नंतर आता पुन्हा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘प्रश्न पैश्यांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. ५०० कोटींचा दावा ठोकू किंवा १००० कोटींचा ठोकू पण स्वाभिमानाची किंमत असते. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला त्यांचे पैसे नकोत. त्यांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही. आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: