सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आताचे दर –

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आताचे दर –

नवी दिल्ली : सोने- चांदी खरेदी करण्यासाठी चांगली बातमी आहे. देशांतर्गत सोने-चांदीच्या बाजारात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या घसरणतील परिणाम देशांतर्गत दरात झालेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचे भाव ०.७५ टक्क्यांनी प्रति १० ग्रॅम कमी झाले.

सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये कमजोरी अधिक होती. डिसेंबर वायदा चांदीचे भाव १ टक्क्यांहून अधिक घसरले. मागील सत्रात सोने सपाट स्तरावर बंद झाले होते, तर चांदी १.२ टक्के वाढली होती.

सोने-चांदीची नवी किंमत
आज ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याचे भाव एमसीएक्सवर ३४९ किंवा ०.७५ टक्क्यांनी घसरून ४६,३२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणे चांदीमध्येही घट झाली. डिसेंबर वायदा चांदी ६३२ रुपये किंवा १.०३ टक्क्यांनी घसरून ६०,५४८ रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव ०.३ टक्क्यांनी घसरून २२.६० डॉलर प्रति औंस झाले.

सराफा बाजारात सोने महाग
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत १९६ रुपयांनी वाढून ४५,७४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. सोन्याप्रमाणे चांदीही वाढली. एक किलो चांदीचा भाव ३१९ रुपयांनी वाढून ५९,६०८ रुपये प्रति किलो झाला

ग्लोबल न्युज नेटवर्क: