नरेंद्र मोदींना रोखता आले असते कोरोना संकट पण, पुन्हा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातून साधण्यात आला निशाणा

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आज ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्याचबरोबर रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला असताना १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र आद्यपही लसीच्या साठा अभावी लसीकरणाला सुरवात झालेली नाही आहे.

या सर्व घडामोडीत देशातील विरोधकांकडून आणि काही तज्ज्ञांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील आता टीका केली जात आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिआत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. या संकटासाठी मोदींचा अतिआत्मविश्वास सर्वाधिक जबाबदार आहे. कोरोनाचे संकट असून देखील मोदींच्या प्रशासनाचा प्रयत्न हाच होता की भारताची पुन्हा सुस्थितीत आणि सर्वकाही सुरळीत झाले असल्याची प्रतिमा तयार केली जावी.

द गार्डियनने प्रकाशित केलेल्या आपल्या स्तंभलेखातून ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केले आहे. भारतात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, ऑक्सिजन अभावी लोक मरत असताना अनेक राजकीय नेते मात्र त्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवरच दबाव टाकत होते. ऑक्सिजन तुटवड्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कारण त्यांच्यामते ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचे या स्तंभात म्हटले आहे. ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यावर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जगातील सर्वात मोठा नदीकिनारी होणारा धार्मिक सोहळा, कुंभमेळा, भरवण्यास परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाला पंतप्रधानांचीही मंजुरी असल्याचे देखील यात म्हटले आहे.

ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सने छापलेल्या ‘द ट्रॅजेडी ऑफ इंडियाज सेकंड वेव्ह’ या लेखामध्ये तर इशाराच देण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत या संकटकाळासाठीची त्यांची जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत देशभर अशाच चिता जळत राहतील असे म्हंटले आहे.

Team Global News Marathi: