चंद्रकांत पाटील आणि लॉजिकचा दूरपर्यंत संबंध नाही, रुपाली चाकणकर यांनी लगावला टोला

 

बौद्धिक विचार करून ज्यावेळी विरोध करता येत नाही, समोरच्या व्यक्तीला उत्तर देता येत नाही, तेव्हा त्यांच्या घरच्या लोकांवर उतरण्याची परंपरा चंद्रकांत पाटील यांनी कायम राखली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि लॉजिकचा काही फार जवळचा संबंध असेल असं वाटत नाही’ अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील हे एखादी प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते बोलता कमी बरळता जास्त. अलीकडेच त्यांनी १० मार्चला महाविकास आघाडी सरकार पडणार आणि भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार असं म्हणाले. पण, दुसऱ्याच बाजूला चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली आणि कार्यकर्त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी बोलावे लागते असं म्हणाले’ असं म्हणत चाकणकर यांनी पाटील यांची खिल्ली उडवली.

बौद्धिक विचार करून ज्यावेळी विरोध करता येत नाही, समोरच्या व्यक्तीला उत्तर देता येत नाही, तेव्हा त्यांच्या घरच्या लोकांवर उतरण्याची परंपरा चंद्रकांत पाटील यांनी कायम राखली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि लॉजिकचा काही फार जवळचा संबंध असेल असं वाटत नाही’ असा टोलाही त्यांनी लगावला.

Team Global News Marathi: