महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर

 

गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. पदावरील नियुक्‍तीची राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर या आज महिला आयोगाच्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती. त्यांनी या संधीच सोने करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक युद्ध सुद्धा पाहण्यास मिळाले होते. तसेच वाघ यांचया टीकेला चाकावर यांनी अनेकदा सडेतोड उत्तर दिले होते.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड होण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चित्रा वाघ यांनी वादग्रस्त ट्‌विट केले होते. त्यांच्या या ट्‌वीटनंतर एकच गोंधळ उडाला होता. परंतु, रुपाली चाकणकर यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली होती. अखेरीस आज रुपाली चाकणकर यांची अधिकृत निवड झाली असून उद्या त्या पदभार स्विकारतील.

Team Global News Marathi: