ते मला पेंग्विन म्हणतात याचा मला अभिमान, आदित्य ठाकरेंचा विरोधकांना जोरदार टोला

 

शिवसेना आणि नव्याने स्थापन झालेला शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांकडून शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका करताना अनेकदा पेंग्विनचा उल्लेख केला जातो. मात्र, आदित्य ठाकरेंनी या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देताना पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असं म्हटलं आहे.

ते म्हणाले, पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास अधिकाधिक लोकं आले होते आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा,आम्ही अशी अनेक काम केली आहेत. त्याबद्दलही बोलत राहा. कोस्टल रोड सेना, असेही म्हणू शकता, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

टेंभी नाक्यावर जाऊन देवीचे दर्शन घेणार का, या प्रश्नावर बोलताना, उद्धव ठाकरे असतील मी असेन, आम्ही तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आता आदित्य ठाकरेंच्या या विधानावर विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पाहणे औसूक्तेचे ठरणार आहे.

Team Global News Marathi: