“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा.”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

 

सांगली | भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राणे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

यावरून भाजप नेते आणि महाविकास अगदी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,’ असे राणे यांच्याबाबत त्यांनी म्हंटले आहे.

 

भाजप नेत्यांमधील आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही आघाडी सरकावर निशाणा साधला जातो. त्यांनी भाजप आमदार नितेश राणे याच्या कालच्या अटक प्रकरणावरून एक सूचक असे ट्विट केले आहे. त्यांनी नितेश राणे यांचा एक फोटो ट्विट केला असून त्यावर ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,’ असे कॅप्शन दिले आहे.

Team Global News Marathi: