गर्दी का केली विचारणाऱ्या पोलिसांवर जमावाने केला हल्ला

सध्या संपूर्ण राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा बडगा पोलीस खात्याने उचलला आहे. दरम्यान काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यात नुकतंच नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी जमा केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार संगमनेर शहरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी गर्दी करण्यास मनाई केली असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.

संगमनेर शहरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी गर्दी करण्यास मनाई केली तसेच गर्दी केल्याचा जाब त्यांना विचहराला होता. जाब विचारताच जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.

Team Global News Marathi: