‘आय फोन’ साठी सीबीआय अधिकाऱ्याने फोडला अनिल देशमुखांचा गोपनीय अहवाल

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडी तसेच सीबीआय यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. काही दिवसांपाऊर्वी त्यांच्या मुलाची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यातच सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने देशमुख यांच्या संबंधित गोपनीय अहवाल फोडला होता. या संदर्भात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोपनीय अहवाल फोडण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच म्हणून महागडा आयफोन १२ प्रो हा स्मार्टफोन देण्यात आला होता, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित चौकशीचा अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील तपासासाठी तिवारी दोन वेळा पुण्याला गेला होता. तेथे आनंद डागा आणि तिवारी यांची भेट झाली. त्यावेळी त्याला हा फोन देण्यात आला. या फोनची किंमत १ लाख रुपयांहून अधिक आहे. हा फोन जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याच फोनचा वापर करुन तिवारीने तपासासंबंधी अतिशय संवेदनशील कागदपत्रे व माहिती आनंद डागा यांना पुरविली.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार प्रकरणाचा गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका उपनिरिक्षकालाअटक केरण्यात आली आहे. अनिल देशमुख देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासाचा अहवालाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. तर अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: