राज्यात दिवसभरात ४ हजार ३१३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; 92 मृत्यू

मुंबईः महाराष्ट्रात ५० हजार ४६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील ६४ लाख ७७ हजार ९८७ कोरोना रुग्णांपैकी ६२ लाख ८६ हजार ३४५ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३७ हजार ६४३ मृत्यू झाले. तसेच राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ३ हजार ५३३ जणांचा इतर कारणाने मृत्यू झाला.

राज्यात झालेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० कोरोना चाचण्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ११.८९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.०४ टक्के आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ३१३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ९२ मृत्यूची नोंद झाली.

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ४ हजार ३६० जण दिवसभरात बरे झाले. कोरोनामुळे राज्यात २ लाख ९८ हजार ९८ जण होम क्वारंटाइन तर १ हजार ९५४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: