“सीबीआय चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’.” भाजपनेचा थेट सुप्रिया सुळे यांना सवाल

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचालयाने अर्थात ईडीची कारवाई झाल्यानंतर महाविक आघाडीच्या नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावरच काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकार दडपशाहीचं राजकारण करत असून विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत.

विरोधक खोटे पुरावे सादर करते असल्याचे म्हटले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. यावरच आता भाजपने प्रत्युत्तर देत थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निशाण्यावर धरले आहे.

“आदरणीय सुप्रिया सुळे जी, पेनड्राईव्ह बॉम्बला फुसके म्हणण्यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा तरी विचार करायचा होता. पेनड्राईव्ह बद्दल सांगायचं झालं तर, प्रवीण चव्हाणने कुण्यातरी मोठ्या साहेबांचा उल्लेख केला आहे. CBI चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’ कोण? हे देखील कळेल!”, असा इशारा भाजपने राष्ट्रवादीला दिला आहे.

 

Team Global News Marathi: