सावधान ; विजांच्या कडकडाटासह राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता

सावधान ; विजांच्या कडकडाटासह राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Maharashtra Weather rain forcast update : मुंबई : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rain)झाला.

आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. कोकण(Konkan), मध्य महाराष्ट्र(Central Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस कोसळणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर कोकणातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुढील 24 तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: