सावधान: कोरोना रुग्णसंख्या घसरली… पण धोका कायम! महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

सावधान: कोरोना रुग्णसंख्या घसरली… पण धोका कायम! महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

 

देशात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आता घसरू लागला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, परंतु धोका मात्र कायम आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे 90 जिह्यांमध्ये आहेत तर देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत, अशी माहिती पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला तरी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी देशातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. देशात 86 जिल्हे असे आहेत जिथे रोज 100 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत असे त्यांनी सांगितले. आता काही ठरावीक भागांमध्येच रुग्ण आढळत आहेत. राज्यांचा विचार केला तर देशातील 53 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात 3 जुलै रोजी 8700 रुग्ण आढळले होते. ती संख्या 6 जुलै रोजी कमी होऊन 6700 झाली. त्यानंतर ती वाढल्याचेच दिसत आहे. केरळमध्येही 2 जुलै रोजी 12,800 कोरोना रुग्ण होते. ते 6 जुलै रोजी 8300 पर्यंत घसरले आणि नंतर रोज त्यात वाढ होत आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. 66 जिल्हे असे आहेत जिथे 8 जुलै रोजी पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त दिसून आला असे त्यांनी सांगितले.

रिकव्हरी रेट वाढला

देशात कोरोनामधून बरे होणाऱयांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या रिकव्हरी रेट 97.2 टक्के इतका आहे, परंतु दुसरी लाट संपलेली नाही आणि तिसरी लाट कधी येईल नेम नाही अशी परिस्थिती कायम आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

निष्काळजीपणातही वाढ; पर्यटनस्थळे, बाजार गजबजले

रिकव्हरी रेटबरोबर नागरिकांचा निष्काळजीपणाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना नियमावलीचे पालन होत नाही. पर्यटनस्थळे आणि बाजारांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यटनस्थळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही आणि अनेक जण मास्कही लावत नसल्याचे दिसत आहे. लोकांचा हा निष्काळजीपणाच कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: