राज्यात 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्ण; शनिवारी 8,296 नव्या रुग्णांची नोंद

ग्लोबल न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात 8 हजार 296 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 026 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 49 हजार 264 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 06 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.08 एवढा झाला आहे.

 

महाराष्ट्रात आज 179 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 25 हजार 528 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.03 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 38 लाख 00 हजार 139 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 580 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 737 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. पुण्यात 18 हजार 237 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाण्यात 16 हजार 598, मुंबईत 11 हजार 558 तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात 13 हजार 806 तर सांगली जिल्ह्यात 11 हजार 465 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या पाच जिल्ह्यांत दहा हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, पश्चिम महाराष्ट्रातील अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: