व्यंगचित्र ट्विट करत अतुल भातखळकरांची शरद पवार, उद्धव ठाकरें यांच्याश नाना पटोले यांच्यावर टीका

 

मुंबई | महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अटक प्रकरण, ओबीसी आरक्षण, मविआ नेत्यांवर होणाऱ्या ईडी कारवाया यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता हे प्रश्न महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे झाले आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.

 

तर दुसरीकडे पहिलाच दिवस घोषणा, आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. त्यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक व्यंगचित्र ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान या व्यंगचित्रामध्ये ‘सर नही झुकाएंगे’ म्हणत ED समोर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले मान उंचाऊन उभे आहेत. तर ‘सर नही उठाएंगे’ म्हणत कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमसमोर हे तिन्ही नेते झुकताना दाखवले आहे. आता या व्यगंचित्रामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दाऊद आणि हसीना पारकर यांच्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना सध्या ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अजूनही त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नाहीये. यावरूनच भाजपने मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यामागे संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे असल्याचा आरोप केला आहे.

Team Global News Marathi: