कारच्या भीषण अपघातात सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघांचा जागींच मृत्यू

 

पुणे | बारामती रस्त्यावरील तरडोली गावच्या हद्द्दीतील राखीव वनक्षेत्रालगत मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ट्रक्टर व कारचा भिषण अपघात झाला. यामध्ये बारामती येथील कवीता उदय शहा, अश्विनी श्रेणीक भांडार, मिलींद श्रेणीक भांडारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक वमहीला गंभीर जखमी झाले आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यावरुन बारामती येथे जाणारी वॅगनर ही तरडोली गावच्या हद्दीत खटकळीच्या ओढ्यामध्ये आली असताना उसाने भरलेला ट्रक्टर नं एम. एच ४२ बी. बी .८५५७ ची ट्रेलर नं एम. एच . ४२ क्यु ५७१३ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचुर झाला होता.

सदर घटनेची खबर मिळताच तरडोलीचे परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केले होते. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, एएसआय जाधव, पोलीस नाईक प्रशांत पिसाळ, पोलीस मित्र परेश भापकर यांनी धाव घेतली व जखमीला रुग्णालय हलविले कारमधील कबीता उदय शहा, अश्विनी श्रेणीक भंडारी तसेच मिलींद श्रेणीक भांडारी ह्यांचा जागीच जागीच मृत्यू झाले. तर गाडीतील बिंदीया सुनिल भांडारी या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

Team Global News Marathi: