भायखळ्याच्या जिजामाता प्राणिसंग्रहालयात वन्यजीव प्राण्यांची देखभालीसाठी मनपा रुग्णालय उभे करणार

मुंबई : भायखळ्यातील वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय लवकरच नव्या विदेशी पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या नव्याने संग्रालयात येणाऱ्या पाहुण्यांच्या देखभालीसाठी छोटेखानी प्राण्यांचे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

येणाऱ्या काळात वन्यप्राण्यांची देखभाल आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास तिथल्या तिथेच उपचार करता यावेत यासाठी राणीच्या बागेत लवकरच सुसज्ज असे प्राण्यांचे २४ तास उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग, उपचार कक्ष, क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, पिंजरे अशा विविध सुविधा असणार आहेत.

सध्या राणीच्या बागेत सुसज्ज असे आधुनिकरणाचे काम मनपाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच देश-विदेशातील प्राणी राणीच्या बागेत दाखल होत आहे. मागच्या वर्षभरात वाघाची जोडी, तरस असे वन्य प्राणी दाखल झाले आहेत. या प्राण्यांच्या प्रकृतीची काळजी घेता यावी यासाठी उद्यानाच्या आवारातच रुग्णालय उभारण्याचा निर्णय बृहमुंबई महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Team Global News Marathi: