मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलीचे अकाउंट हॅक, मित्रपरिवाराकडे गुगल आणि पे-फोन द्वारे केली पैशाची मागणी

प्रसिद्ध आणि नामंकित व्यक्तींच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्या द्वारे पैशाची मागणी करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून आले आहेत. त्यातच आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत हाच प्रकार घडला आहे. जयश्री थोरातचं फेसबुकचं बनावट अकाऊंट बनवण्यात आले आहे.

डॉ. जयश्री थोरातांच्या फेसबुक अकाऊंटवरून एका अज्ञात व्यक्ती अकाउंट बनवून पैशाची मागणी करत आहे, याप्रकरणी सायबर क्राईमची तक्रार संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सुरू आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर सायबर क्राईम नजर ठेऊन आहे.

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात यांचं बनावट अकाऊंट तयार केलं आहे. यासाठी बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या फेसबुक पेजवरील फोटोंचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. या बनावट अकाऊंटद्वारे पैशाची मागणी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे जयश्री थोरात यांच्या मित्र परिवाराकडून गुगल पे आणि फोन पे द्वारे पैशांची मागणी केली जात आहे अशी माहिती पुढे येत आहे.

Team Global News Marathi: