राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजपा युती संदर्भात चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान |

 

नाशिक | महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे सोबत युतीचे संकेत दिलेले असताना आज सकाळी या दोन्ही नेत्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट झाली. आता याभेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी युती संदर्भात सूचक विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना आश्वासक चेहरा म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली असून युतीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच संजय राऊत कशावरही बोलू शकतात, असंही पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. जर त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत करु आणि तरच आम्ही सोबत येऊ शकतो असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मनसे सोबत युती ही चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो, असं म्हणत त्यांनी भाजप मनसे युतीच्या चर्चांवर स्पष्टिकरण दिलं आहे. माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो असं राज ठाकरे मला बोलल्याचंही पाटलांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: