मात्र गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाहीच, आशिष शेलारांचा टोला

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यात रोकठोक हे १५ दिवसांनी आपल्या कुटुंबियांसह प्रकट झाले होते. यावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली होती. यावरूनच आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करून म्हटले आहे की,’कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरुवर’ कारवाई नाही , एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत.’ महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे. तो मी नव्हेच,‼️ असं ट्विट करत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला आहे.

या शक्तीप्रदर्शनावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: